पोस्ट्स

अल्लाहशिवाय कोणीही इलाह (रब्ब, पूजनीय , तारणहार , पालनहार) नाही.मुहम्मद (स.) अल्लाहचे पैगंबर आहेत.

" इस्लामचे मूलभूत स्तंभ "  

لَا إِلَٰهَ إِلَّا ٱللَّٰهُ مُحَمَّدٌ رَسُولُ ٱللَّٰهِ

अल्लाहशिवाय कोणीही इलाह 
(रब्ब, पूजनीय , तारणहार , पालनहार) नाही.
मुहम्मद (स.) अल्लाहचे पैगंबर आहेत. 

इस्लामचे तीन मूलभूत स्तंभ 

    एकेश्वर (वहदत तौहीद )
त्या एकमेव सर्वशक्तिमान आणि परिपूर्ण
अल्लाहवरच श्रद्धा ठेवा. दोन वा अधिक ईश्वरांची 
(अनेकेश्वर ) उपासना स्वीकारू नका ईश्वर केवळ एकच आहे.  (कुरआन 16:51) 

     पैगंबर ( रिसालत ) 
पैगंबरत्वावर आणि त्याच्यावर (ईश्वरीय अवतरणावर ) विश्वास ठेवा. तोच अल्लाह आहे ज्याने आपल्या पैगंबरास मार्गदर्शन व सत्याचा धर्म देऊन पाठविले,
ते यासाठी की त्यास ( इतर ) प्रत्येक जीवनपद्धतीवर सर्वोच्च स्थान प्राप्त करता यावे ... 
(कुरआन 9:33, 48:28, 61:9) 

 मरणोत्तर जीवन ( आखिरत ) 
मनुष्य मेल्यानंतर परत जीवित केला जाईल व त्याला
जीवन कसे व्यतीत केले, याबद्दल ईश्वराला जाब द्यावा लागेल यावर श्रद्धा ठेवा . आम्हीतर निश्चितपणे अल्लाहसाठीच आहोत आणि आम्ही त्याच्याकडे परतणार आहोत . 
(कुरआन 2 :156 ) 

टिप्पणी पोस्ट करा

© Marathi | Ummat-e-Nabi.com. All rights reserved. Distributed by ASThemesWorld