कुरआन आपल्या मातृभाषेत
وَلَئِنْ أَتَيْتَ الَّذِينَ أُوْتُواْ الْكِتَابَ بِكُلِّ آيَةٍ مَّا تَبِعُواْ قِبْلَتَكَ وَمَا أَنتَ بِتَابِعٍ قِبْلَتَهُمْ وَمَا بَعْضُهُم بِتَابِعٍ قِبْلَةَ بَعْضٍ وَلَئِنِ اتَّبَعْتَ أَهْوَاءهُم مِّن بَعْدِ مَا جَاءكَ مِنَ الْعِلْمِ إِنَّكَ إِذَاً لَّمِنَ الظَّالِمِينَ
QURAN 2:145
ह्यापूर्वी ज्यांना ग्रंथ दिले आहेत.
ते लोक चांगल्या प्रकारे जाणतात कि किबलाच्या परिवर्तनाचा
(उपासना दिशा बदलण्याचा) हा आदेश त्यांच्या पालनकर्त्याकडूनच आलेला असून तो सत्यावर आधारित आहे परंतु याउपरही हे जे काही करीत आहेत त्यापासून अल्लाह अनभिज्ञ नाही . तुम्ही या ग्रंथधारकांकडे कोणतेही संकेत घेऊन या तरी हे तुमच्या उपासना दिशेचे अनुकरण करणार नाहीत. आणि तुम्हीही त्यांच्या उपासना दिशेचे अनुसरण करण्याची शक्यता नाही . आणि त्यांच्यापैकी कोणताही गट दुसऱ्या गटाच्या उपासना दिशेचे अनुकरण करणार नाही. तेव्हा जर ज्ञानानंतर , जे तुमच्याकडे आले आहे , त्यांच्या इच्छेनुसार अनुसरण केलेत तर खचितच तुमची गणना अत्याचाऱ्यांमध्ये होईल .